अब्दुल सत्तारांचा आदर्श, मुलाच्या लग्नात 555 दुष्काळग्रस्त जोडप्यांचा सामूहिक विवाह

May 1, 2016 5:25 PM0 commentsViews:

औरंगाबाद – 01 मे : राज्यात राजकीय नेत्यांनी आपल्या मुला मुलींची लग्न धुमधडाक्यात लावतांना आपण पाहिलीत. कोट्यवधी रूपयांचा चुराडा लग्नामध्ये खर्च केला जातो. असल्या लग्नांची चर्चाही जोरदार होते.पण, सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मात्र सर्वच राजकीय नेत्यांसमोर मोठा आदर्श निर्माण केलाय.sattar333

सत्तार यांनी आपल्या मुलाच्या लग्नात 555 गोरगरीब दुष्काळग्रस्त जोडप्यांची लग्न लावण्याची तयारी केलीये. आज सायंकाळी हा लग्न सोहळा पार पडणार आहे. या लग्नासाठी माजी मुंख्यमंत्री अशोक चव्हाण,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह नेते उपस्थित राहणार आहेत. जवळपास 50 एकर वर हा लग्न सोहळा पार पडणार आहे. दोन लाखांच्या वर लोकांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे.555 जोडप्यांना संसार उपयोगी वस्तूही देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, 555 पैकी 30 जोडपे हे अनाथ आहेत. अब्दूल सत्तार यांच्या कार्याबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा