विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीत 18 रुपयांनी वाढ

May 2, 2016 9:07 AM0 commentsViews:

LPG gas sucidyनवी दिल्ली – 02 मे : पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानंतर आता विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरही महागले आहेत. केंद्र सरकारनं विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीत 18 रुपयांनी वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या दरवाढीमुळे ही किंमत वाढवल्याचं कारण सरकारकडून पुढे केली जाते आहे.

शनिवारी रात्री केंद्र सरकारनं पेट्रोलच्या प्रतिलिटरच्या दरात 1.06 रुपये, तर डिझेलच्या दरात 2.94 रुपयांनी वाढ केली होती. तेल पुरवठा कंपन्यांनी विनाअनुदानित रॉकेलच्या किमतीत 3 रुपयांनी वाढ केली आहे. वर्षाकाठी 12 सिलेंडरवर ग्राहकांना अनुदान मिळते. मात्र विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत 18 रुपयांनी वाढ केल्यानं ग्राहकांना याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. आता विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 509.50 वरून 527.50 रुपये होणार आहे. 1 एप्रिलला 4 रुपयांनी तर 1 मार्चला 61.50 रुपयांनी, 1 फेब्रुवारीला 82.5 रुपयांनी विनाअनुदानित सिलेंडरच्या किमती कमी केल्या होत्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा