31 तासांची झुंज अपयशी, उपचारादरम्यान चिमुरड्या सुनीलचा मृत्यू

May 2, 2016 9:34 AM0 commentsViews:

पुणे – 02 मे : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या चार वर्षांच्या सुनील मोरे या चिमुरड्याला तब्बल 31 तासांनंतर बाहेर काढण्यात यश आलं. पण, उपचारादरम्यान सुनीलला दुदैर्वी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.shrur_boy33

शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे सुनील मोरे हा चार वर्षाचा चिमुकला शेतात खेळत असताना अचानक बोअरवेलमध्ये पडला. सुनील हा आपली आजी तुळसाबाई मोरे हिच्या सोबत नवनाथ शितोळे यांच्या शेतामध्ये गेला होता. शितोळे यांच्या शेतात नुकतीच बोअरवेलची खोदाई करण्यात आली होती. हा बोअरवेलचा खड्डा सुनीलच्या खेळत असताना लक्षात न आल्याने सुनील हा बोअरवेलमध्ये पडला.

सुनील बोरवेलमध्ये पडल्याच लक्षात येताच गावाकर्‍यांनी बचावकार्य हाती घेतलं. वरदविनायक हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मदतीने या बोअरवेलमध्ये पडलेल्या सुनीललातातडीने ऑक्सिजन पुरवण्यात आलं. सोबतच स्थानिक ग्रामस्थांनी दोन जेसीबीच्या साहाय्याने या ठिकाणी खोददकाम सुरू केलं. जे सी बी मशीनने बोअरवेलच्या चारही बाजूला खड्डा खोदून सुनीलला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते एवढंच नाहीतर एनडीआरएफची एक टीमही घटनास्थळी पोहोचली होती.

तब्बल 31 तासांच्या प्रयत्नानंतर सुनीलला काल रात्री 10 च्या सुमारास बाहेर काढण्यात आलं. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. चार वर्षांच्या या चिमुरड्याची बोअरवेलमधली 31 तासांची झुंज अपयशी ठरलीय.सुनीलच्या मृत्यूमुळे सर्वच जण हळहळले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा