कपिलच्या बॉलवर खडसे क्लीन बोल्ड

May 2, 2016 12:48 PM0 commentsViews:

02 मे : जळगावमध्ये रविवारी निखिल खडसे स्मृती चषक स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी माजी क्रिकेटर कपिल देव आणि अभिनेत्री अमिशा पटेल उपस्थित होते. यावेळी महसुलमंत्री एकनाथ खडसेंनाही क्रिकेटचा मोह आवरला नाही, त्यांनी बॅट घेतली आणि पिचवर आले. पण, कपिल यांच्या पहिल्याच बॉलवर खडसे क्लीन बोल्ड झाले. आपल्या भाषणात, क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांकडेही लक्ष दिलं पाहिजे, असं कपिल म्हणाले. आयपीएल महाराष्ट्राबाहेर नेण्यावर आपण योग्य वेळी बोलू असंही ते म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा