कीनन-रुबिन हत्या प्रकरणाचा 5 मे रोजी फैसला

May 2, 2016 1:44 PM0 commentsViews:

Keenan-Reubenमुंबई – 02 मे : 2011 साली मुंबईला हादरवून टाकणार्‍या कीनन-रुबिन हत्या प्रकरणाचा फैसला आता 5 मे रोजी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून गुरुवारी 5 मे रोजी निर्णय देणार आहे.

20 ऑक्टोबर 2011 मध्ये कीनन सांतोस आणि रुबिन फर्नांडिस हे तरूण कीननच्या मैत्रिणीसोबत अंधेरीच्या एका हॉटेलमध्ये जेवून बाहेर पडले होते. त्यावेळी कीननच्या मैत्रिणीची रस्त्यावर उभ्या असलेल्या आरोपींनी छेड काढली होती. या दोघांनी त्याला विरोध केल्यावर आरोपी निघून गेले. थोड्यावेळानंतर आरोपी त्यांच्या 20 साथीदारांबरोबर चाकू आणि कोयते घेऊन परतले. त्यांनी कीनन आणि रुबिनचा मारहाण करत भररस्त्यावर खून केला. शर्मेची बाब म्हणजे, हा सगळा प्रकार सुरू असताना तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी फक्त बघ्यांची भूमिका घेतली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 20 जणांना अटक केली होती. त्यातल्या चौघांवर हत्येचा आरोप आहे. 5 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या प्रकरणाचा फैसला आता 5 मे रोजी होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा