संजूबाबा भाजपच्या व्यासपीठावर, भाजप उमेदवारांना विजयी करण्याचं केलं आवाहन

May 2, 2016 3:14 PM0 commentsViews:

02 मे : मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणी तुरुंगातून सुटल्यानंतर अभिनेता संजय दत्तने पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने चक्क भाजपच्या व्यासपीठावर संजूबाबा झळकला.

sanjay_dutt3मोहित कंभोज यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात संजय दत्त भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यासोबत व्यासपीठावर दिसला.यावेळी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन संजय दत्तने केलं.

विशेष म्हणजे, संजय दत्तचे वडील सुनील दत्त हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. तसंच संजय दत्तची बहिण प्रिया दत्त यांच्या काँग्रेसच्या माजी खासदार होत्या. जेव्हा संजय दत्त तुरुंगातून पॅरोल आणि फरोलवर बाहेर यायचा त्यावेळी त्याच्यावर भाजपच्या नेत्यांनी कडाडून टीका केली होती. आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजूबाबा भाजपच्या कार्यक्रमात हजर राहून नवे संकेत दिले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा