बेस्टचे 52 बसमार्ग बंद करण्याच्या निर्णयाला अखेर स्थगिती

May 2, 2016 7:40 PM0 commentsViews:

BEST-buses

मुंबई – 02 मे : बेस्ट प्रशासनाने मुंबईमधल्या 52 बसमार्ग बंद करण्याचा निर्णय अखेर मागे घेतला आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या बेस्ट भवनावरील मोर्च्यानंतर प्रशासनाला 52 बसमार्ग बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी लागली.

बंद झालेली ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना घेराव घातला होता. त्यानंतर हा निर्णय घेतल्याचं जगदीश पाटील यांनी सांगितल आहे. बेस्टकडून बंद करण्यात येणारे 52 मार्ग आधीपासूनच तोटय़ात आहेत. यात हे मार्ग नियमित चालू ठेवणं म्हणजे बेस्टच्या तोटय़ात भर घालण्यासारखे आहे. ही परिस्थिती गंभीर असल्याचं सांगत बेस्टकडून हे 52 मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता लवकरच बेस्टची सेवा पुन्हा टप्प्या- टप्प्याने सुरू करण्यात येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा