पाईपलाईन फुटल्याने ठाणे, मुलुंड जलमय

March 25, 2010 9:37 AM0 commentsViews:

25 मार्चठाण्यातील कापूरबावडी आणि मुलुंड कामगार हॉस्पिटलच्या मागे पाईप लाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया जात आहे. मुलुंड भागात गुडघाभर पाणी साचल्याने एलबीएस रोडवरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या दोन्ही पाईप लाईन तानसा डॅमच्या आहेत. या लाईन पूर्णपणे गंजल्याने फुटल्याचे महापालिकेचे हायड्रॉलिक इंजीनिअर व्ही. पी. देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. अगोदरच पाणी कपात सहन करावा लागणार्‍या मुंबईकरांना आता यामुळे आणखी पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.एकीकडे मुलुंडमध्ये पाइपलाइन फुटली असताना ठाण्यातही पाइपलाइन फुटण्याची परंपरा सुरूच आहे. कापूरबावडी इथे बीएमसीच्या जलअभियंता कार्यालय परिसरातच ही पाइपलाईन फुटली. ही पाइपलाईन फुटल्याने इथेही लाखो लीटर पाणी वाया गेले. मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाइपलाईन फुटल्याने पाणीकपात संकट आणखीनच वाढले आहे. या भागात राहणार्‍या अनेक लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले.

close