साखरसम्राटांना दणका, आयुक्तांचे 7 कारखान्यांवर जप्तीचे आदेश

May 3, 2016 9:04 AM0 commentsViews:

sugar_cane03 मे : साखर आयुक्तांनी साखर कारखानदारीवर आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. एफआरपीप्रश्नी 66 कोटी 81 लाख रुपये थकविल्याने 5 कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश देण्यात आलेत. 7 कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करून सुमारे 173 कोटी 78 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

तर ऐंशी टक्क्यांपेक्षा कमी रक्कम दिलेल्या 8 कारखान्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. कारवाई करण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये अनेक बड्या नेत्यांचे कारखाने आहेत.

कारवाई करण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये अनेक बड्या नेत्यांचे कारखाने आहेत. यापूर्वीचा अनुभव पाहता सहकारमंत्री अश्या कारवाईवर तात्काळ स्थगिती देतात. आता या कारवाईला तरी स्थगिती देऊ नये ज्यामुळे शेतक र्‍यांचे पैसे मिळण्यास मदत होणार आहे अशी मागणी शेतकर्‍यांकडून होतेय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा