दहशतवादी अबु जुंदालला आज सुनावणार शिक्षा ?

May 3, 2016 9:18 AM0 commentsViews:

03 मे : इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अबु जुंदालच्या शिक्षेवर आज (मंगळवारी) निकाल येण्याची शक्यता आहे. जुंदाल याच्यावर बेकायदा शस्त्रसाठा बाळगल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आज हायकोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे.abu_jundal

महाराष्ट्र एटीएससच्या पथकाने 8 मे 2006 रोजी औरंगाबादजवळ चांदवड-मनमाड महामार्गावर एका टाटा सुमो व एका इंडिका कारचा पाठलाग करून तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यावेळी 30 किलो आरडीएक्स, 10 एके-47 बंदुका आणि बंदुकीच्या 3200 गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. ती कार जुंदाल चालवत असल्याचा आरोप आहे.

जुंदाल तेव्हा पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी झाला होता. मूळचा बीड जिल्ह्यातील असलेल्या जुंदाल माळेगावला गाडी घेऊन गेला आणि तिथे त्याने एका परिचिताच्या ताब्यात गाडी दिली. त्यानंतर काही दिवसांनी खोट्या पासपोर्टवर तो बांग्लादेशात पळून गेला.

पुढे तो पाकिस्तानला गेला. मुंबई विशेष मोक्का न्यायालयाने 17 ऑगस्ट 2012 रोजी औरंगाबाद बेकायदा शस्त्रास्त्रसाठा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 23 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.जुंदाल वगळता 2006 च्या या प्रकरणातील इतर आरोपींना अटक करण्यात आली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा