यावर्षी राहुल गांधी स्विकारतील अध्यक्षपद, जयराम रमेश यांनी दिले संकेत

May 3, 2016 9:33 AM0 commentsViews:

jayaram_rameshदिल्ली – 03 मे : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यावर्षी अध्यक्षपदाची सूत्र हातात घेतील, असे संकेत काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी दिले आहे. 2017 साली उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आहेत, आणि त्या पार्श्वभूवर आता हालचाली सुरू झाल्या आहेत.

राहुल गांधींना पक्ष यूपीसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणूनही जाहीर करू शकते. याचं कारण म्हणजे निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यासाठी प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांनी नुकतंच राहुल यांच्यासमोर एक सादरीकरण केलं. प्रियंका किंवा राहुल, यांना जर सीएमपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केलं, तरच काँग्रेसला यश मिळेल, असं किशोर यांनी राहुलना सांगितलं. त्यामुळेच आता काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केलीये. याआधीही काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधी अध्यक्ष होतील असं संकेत दिले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा