पुणे : खड्यात पडून चिमुकल्या भावा-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

May 3, 2016 10:19 AM0 commentsViews:

pimpri4पुणे – 03 मे : उघड्या बोअरवेलमध्ये पडून पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात राहणार्‍या एका 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेला 24 तासही उलटून जात नाहीत. तोवर अशाच पद्धतीने एका बांधकाम साईटवर खोदलेल्या उघड्या खड्यातील साचलेल्या पाण्यात बुडून 2 चिमुकल्या भावा बहिणीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवड़ परिसरातीलभोसरी मध्ये असलेल्या “उत्सव होम्स” या खाजगी बांधकाम साईट वर घडलेली ही घटना आहे.

इमारतीच्या उभारणी साठी पाया उभारणीसाठी खोदलेल्या या खड्यात किसन राठोड़ नामक बांधकाम मजुराची एक 4 वर्षाची मुलगी आणि 3 वर्षाचा मुलगा पडला आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. या सगळ्या प्रकारात बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदाराचं अक्ष्यम दुर्लक्ष
झाल्यामुळे प्राथमिक बाबीत समोर आलंय. कॉलम उभारणीसाठी खोदलेल्या या खड्या च्या बाजूला कोणत्याही प्रकार च कुंपन घातल्या गेल नव्हतं आणि या खड्यात 4 फुटापर्यंत पाणी ही साचलेल होतं. त्यामुळे ह्या प्रकारासाठी प्रथम दर्शनी कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिक यांची निष्कळजी असल्याची बाब लक्षात घेत चौकशी करून दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती ,भोसरी पोलिसांनी दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा