अणेंना उपरती, महाराष्ट्राचा केक कापल्याबद्दल मागितली माफी

May 3, 2016 11:49 AM0 commentsViews:

anne_newsनागपूर – 03 मे : वेगळ्या विदर्भासाठी मैदानात उतरलेले माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांना आता उपरती झाली असून महाराष्ट्राचा केक कापल्याबद्दल अणेंनी जाहीर माफी मागितली आहे.

माजी महाधिवक्ते श्रीहरी अणे यांनी 13 एप्रिलला त्यांच्या वाढदिवशी महाराष्ट्राच्या नकाशाचा केक कापला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्यांच्यावर प्रचंड टीकाही झाली होती. अखेर श्रीहरी अणे यांना आपलं चुकल्याची जाणीव झाली आहे आणि त्यांनी माफी मागितली आहे. जे झाले ते अयोग्यचं..माझा कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता. माझ्या या कृतीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना दुखावल्या त्याबद्दल मी माफी मागतो, अशी भूमिका अणेंनी मांडली आहे. मात्र, स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवर आपण अजूनही ठाम असल्याचं श्रीहरी अणेंनी स्पष्ट केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा