बालभारतीच्या पुस्तकात राज्यघटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्षऐवजी ‘पंथनिरपेक्ष’ !

May 3, 2016 1:11 PM0 commentsViews:

balbharti_book03 मे : धर्मनिरपेक्ष शब्दावरून पुन्हा एकदा वादळ निर्माण होण्याची चिन्ह आहे. बालभारतीच्या पुस्तकात राज्यघटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष शब्दाचा ऐवजी पंथनिरपेक्ष शब्द वापरण्यात आलाय. नेमका हा बदल का आणि कशासाठी करण्यासाठी आलाय याबद्दल आता चर्चा सुरू झालीये.

सेक्युलारिझम या शब्दावरून आतापर्यंत अनेकदा राजकीय वाद झाले आहेत. सेक्युलारिझम या इंग्रजी शब्दांचा अर्थ धर्मनिरपेक्ष केला जातो. मात्र, त्याला अनेकदा विरोध केला जातो. त्यातच आणखी एक वाद उद्भवला आहे. राज्यात 2016 च्या सहावीच्या हिंदी बालभारती पुस्तकात राज्यघटनेची प्रस्तावना छापण्यात आली आहे. त्यात सेक्युलॅरिझमसाठी पंथनिरपेक्ष हा शब्द देण्यात आला आहे. 2015 सालच्या म्हणजे गेल्याच वर्षीच्या याच पुस्तकात सेक्युलॅरिझमसाठी धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरण्यात आला होता. त्यामध्ये बदल झाल्यामुळे आता नवा वाद उद्भवला आहे. अशा प्रकारे सेक्युलॅरिझमचा अर्थ बदलून सरकार नेमका कोणता संदेश देऊ पाहतंय याविषयी आता चर्चा होऊ लागली. सुधारित सगळ्या पाठ्यपुस्तकात पंथनिरपेक्ष हा बदल करण्यात आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा