बंगलोर रॉयल चॅलेंजर्स भिडणार दिल्लीला

March 25, 2010 10:27 AM0 commentsViews: 1

25 मार्चआज आयपीलमध्ये पहिली मॅच खेळवली जात आहे, ती बंगलोर रॉयल चॅलेंजर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सदरम्यान. या हंगामात बंगलोर रॉयल चॅलेंजर्स तुफान फॉर्मात आहे. पाचपैकी चार मॅच जिंकत बंगलोर पॉईंटटेबलमध्ये आघाडीवर आहे. जॅक कॅलिस, मनिष पांडे, रॉबिन उत्थप्पा असे दमदार बॅट्समन टीमचे मॅच विनर ठरत आहेत. तर अनिल कुंबळे, प्रवीण कुमार डेल स्टेनची बॉलिंगही प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरायला लावणारी होत आहे. याउलट स्पर्धेत चांगल्या सुरुवातीनंतर दिल्ली डेअरडेव्हिल्सची कामगिरी घसरली आहे. दिल्लीला सलग तीन पराभव पत्करावे लागलेत. टीममध्ये भक्कम बॅट्समन असतानाही मोठा स्कोअर उभारण्यात ते अपयशी ठरत आहेत. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी या मॅचमध्ये दिल्लीला विजय मिळवावा लागणार आहे.

close