सचिन तेंडुलकरही रिओ ऑलिम्पिकसाठी गुडविल अॅम्बेसेडर

May 3, 2016 4:11 PM0 commentsViews:

sachin-tendulkar-1

03 मे : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी गुडविल अॅम्बेसेडर बनण्याचा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा प्रस्ताव स्वीकारला आहे.

रिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी जाणार्‍या भारतीय टीमसाठी गुडविल अॅम्बेसेडर करण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेने बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि नेमबाज अभिनव बिंद्रा यांच्यानंतर आता सचिनची निवड केली आहे. सचिननेही आयओएची ही विनंती मान्य करत गुडविल अॅम्बेसेडर बनण्याची तयारी दर्शवली आहे.

अभिनेता सलमान खानला रिओ ऑलिम्पिकचा सदिच्छादूत केल्यापासून वाद निर्माण झाला होता. सिनेसृष्टीतील काही कलाकार आणि क्रिडापटूंनी सलमान खानच्या नियुक्तीला समर्थन केलं होतं. मात्र कुस्तीपटू योगेश्वर दत्त, ज्येष्ठ धावपटू मिल्खा सिंग यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत टीका केली होती.

त्यानंतर आयओएने नेमबाज अभिनव बिंद्रा, सचिन तेंडुलकर आणि संगीतकार ए. आर. रेहमान यांना गुडविल अॅम्बेसेडर होण्याची विनंती केली होती. अभिनव बिंद्रा यांनी मागच्या आठवड्यात तर सचिन तेंडुलकर यांने आज सचिन तेंडुलकरनेही या पदासाठी होकार कळवल्याने सलमनच्या निवडीमुळे निर्माण झालेल्या वादवर पडदा पडण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा