संदीप सावंत मारहाण प्रकरण: निलेश राणे यांना देश सोडून जाण्यास मनाई

May 3, 2016 8:22 PM0 commentsViews:

sdasadasy

03 मे : काँग्रेस पक्षाचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणाची पुढील सुनावणी 9 मे रोजी होणार असून तोपर्यंत निलेश राणे यांना अंतरीम अटकपूर्व जामीन कायम ठेवण्यात आला आहे. मात्र सुनावणी पूर्ण होईपर्यंत निलेश राणे यांना देश सोडून जाण्यास मनाई केली आहे.

याशिवाय, चिपळूण न्यायालयाने इतर चारही आरोपींना 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज या आरोपींना सुनावणीसाठी खेड सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी कोर्टाने हा निकाल दिला.

राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी आपल्याला गेल्या 24 एप्रिल रोजी रात्री चिपळूण इथल्या घरातून जबरदस्तीने उचलून गाडीत कोंबलं आणि मारहाण करत मुंबईला नेलं, अशा तक्रार तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी पोलिसांकडे नोंदवली होती. यानंतर नीलेश यांच्यासह पाच जणांविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, सावंत यांना मारहाण झाल्याची तक्रार हे सेनानेत्यांचे षड्यंत्र असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा