संमेलनाच्या पूर्वसंध्येला ‘एक पणती’चे आयोजन

March 25, 2010 11:08 AM0 commentsViews: 42

25 मार्च पुण्यात होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्व स्तरातील व्यक्तींचा सहभाग असावा, या उद्देशाने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या संमेलनात स्त्रियांचा जास्तीत जास्त सहभाग वाढविण्यासाठी 'एक पणती' या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संमेलनाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ज्येष्ठ समाज सेविका सिंधुताई सपकाळ यांनी सर्वात आधी पणती पेटवून या कार्यक्रमाची सुरुवात केली. संमेलन काळात म्हणजे 26 मार्च ते 28 मार्च दरम्यान पुण्यातील सर्व महिलांनी आपल्या अंगणात दिवा लावावा, त्यातून स्त्रियांचा सहभाग संमेलनात नोंदवला जाईल, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याचे संमेलनाचे स्वागत अध्यक्ष सतीश देसाई यांनी स्पष्ट केले.

close