तीर्थस्थळांवर कृपादृष्टी

March 25, 2010 11:53 AM0 commentsViews:

25 मार्चयंदाच्या अर्थसंकल्पात धार्मिक स्थळांवर मोठीच कृपादृष्टी करण्यात आली आहे. राज्यातील बहुतेक तीर्थस्थळांच्या विकासासाठी अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी निधी जाहीर केला आहे. तुळजापूर विकास आराखड्यांतर्गत तुळजापूरच्या विकासासाठी 375 कोटी रुपये तर गजानन महाराजांच्या शेगाव तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 360 कोटी रुपयांचा विशेष कृती विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. तुकाराम महाराज जन्मशताब्दीनिमित्त देहू, आळंदी आणि पंढरपूरचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी 681 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. औरंगाबादमधील पैठण तीर्थक्षेत्राचा शिर्डी आणि तुळजापूरच्या धर्तीवर विकास करण्यासाठी विकास प्राधिकरण स्थापन केले जाणार आहे. त्यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.याशिवाय आंगणेवाडीच्या भराडी माता मंदिर आणि परिसर विकासासाठी 2 कोटी, परशुराम तीर्थक्षेत्रासाठी 10 कोटी, कुणकेश्वर देवगड देवस्थानासाठी 2 कोटी, तसेच खंडेरायाच्य जेजुरी विकासासाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पण तीर्थक्षेत्रांवरील ही तरतूद फार विशेष नसल्याचा दावा महसूलमंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

close