‘सूत्रां’चा घोळ सुरूच

March 25, 2010 12:08 PM0 commentsViews: 2

25 मार्च83 व्या मराठी साहित्य संमेलनाची उद्घाटनाची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. तरीही संमेलनाध्यक्ष द. भि. कुलकर्णी अध्यक्षपदाची सूत्रे कुणाकडून स्वीकारणार याविषयीचा घोळ सुरूच आहे. संमेलनाची सूत्रे स्वीकारणे हे कर्मकांड आहे. आपण म. द. हातकणंगलेकर किंवा आनंद यादव या दोघांकडूनही सूत्रे स्वीकारू असे द.भिंनी स्पष्ट केले आहे.पण या विषयावर महामंडळाचे पदाधिकारी स्पष्टपणे बोलायला तयार नाहीत. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी कुठलाच पेच नसल्याचे सांगत रात्री उशिरापर्यंत याबाबत माहिती देण्यात येईल, असे म्हटले आहे. तर महामंडळाचे सचिव कुंडलिक अतकरे यांनी कौतिकराव ठाले पाटीलच सूत्रे सोपवतील असे ठामपणे सांगितले आहे.

close