दुष्काळ अद्याप जाहीर का नाही ? हायकोर्टाचा राज्य सरकारला खडा सवाल

May 4, 2016 12:52 PM0 commentsViews:

drought

03 मे :  राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना सरकारनं अजून दुष्काळ जाहीर का केला नाही असा खडा सवाल काल हायकोर्टाने काल सरकारला विचारला आहे.तसेच मान्सून दाखल होईपर्यंतच्या उपाय योजनांचा तपशीलही मागिला.

राज्यात 29 हजार गावांना टँकर आणि रेल्वेने पाणीपुरवठा सुरू असून विदर्भ आणि मराठवाडय़ातील धरणांचा पाणीसाठा तीन टक्क्यांवर आला आहे. राज्यातील जनता दुष्काळाला सामोरी जात असतानाही सरकारने मात्र अद्याप राज्यात दुष्काळ जाहीर केलेला नाही, ही बाब एका याचिकाकर्त्यांने हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली.

त्याची गंभीर दखल घेत अद्याप दुष्काळ जाहीर का केला नाही, अशी विचारणा न्यायालयाने सरकारकडे केली. तसंच राज्यात सध्या असाधारण परिस्थिती निर्माण झाली असूनही तिचा सामना करण्यासाठी तातडीने उपाय योजले नाहीत, तर मोठी जीवितहानी ओढवेल, अशी भीतीही व्यक्त केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा