‘सैराट’ चित्रपटाची सेन्सॉर कॉपी लीक, नागराज मंजुळेची पोलिसात तक्रार

May 4, 2016 3:10 PM0 commentsViews:

04 मे :  एकीकडे सैराट चित्रपट रेकॉर्डतोड कमाई करत आहे तर दुसरीकडे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाची मूळ प्रिंट लिक झाल्याचे समजते. याप्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पोलिसात धाव घेतली आहे.

Nagraj Manjule final

सैराट चित्रपटाविषयी प्रदर्शनापूर्वीच दर्शकांना मोठी उत्सुकता होती. त्यामुळे प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांमध्ये या चित्रपटाने 12 कोटी 30 लाख रुपयांची कमाई केली आहे. मात्र चित्रपटाची 3 जीबीची मूळ प्रिंट लिक झाल्याचे समजताच नागराज मंजुळे यांनी मंगळवारी पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेतली. याप्रकरणी वांद्रे इथल्या सायबर पोलिस ठाण्यात लेखी तक्रारही त्यांनी दाखल केली आहे.

सैराट चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच याच्या तीन वेगवेगळ्या प्रिंट मोबाईलवर व्हायरल झाल्याचं समोर आलं होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे, पण प्रिंट लीक झाल्याने नागराज मंजुळे यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा