पुणेकरांचा विरोध झुंगारत दौंड, इंदापूरला खडकवासला धरणातून सोडलं पाणी

May 4, 2016 2:02 PM0 commentsViews:

पुणे – 04 मे :  खडकवासला धरणातून दौंड, इंदापूरसाठी एक टीएमसी पाणी सोडण्यास अखेर आज (बुधवारी) दुपारी सुरूवात झाली. खडकवासला धरणातून 300 क्युसेक्स वेगाने पाणी कालव्यात सोडण्यात येत आहे. तसंच रात्री एक वाजल्यापासून एक हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली. खडकवासला धरणावर पाणी सोडू नये यासाठी आंदोलक येण्याची शक्यता असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ÜÖ¯ÖÖêËÖê

इंदापूरला कालव्यातून पाणी सोडूनही ते पोहोचणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे असतानाही इंदापूरला पाणी सोडण्याचा खटाटोप केला जात आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या या अट्टाहासामुळे आठ महिन्यांपासून कपात करून वाचविलेल्या पाण्यावर गदा येणार असून, पुणेकरांना आणखी पाणी कपातीला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दौंडला पिण्यासाठीच पाणी हवे असेल, तर कालव्याऐवजी टँकर किंवा रेल्वेने पाणी पुरविण्याचा विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली होती. पण त्याचा विचारही करण्यात आला नाही.

पालकमंत्र्यांच्या या निर्णयामुळे गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी चौफेर टीका केली असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या निर्णयाविरोधात काल मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी जलसंपदा विभागाच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड केली होती. तर आज (बुधवारी) शिवसेनेने पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिराजवळ घंटानाद आंदोलन केले. पालकमंत्र्यांना सुबुद्धि दे अशी साकडं यावेळी आंदोलकांकडून गणरायाकडे घालण्यात आलं. तसंच गिरीश बापट यांचं कार्यालय समोरच असल्याने पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विरोध केला होता त्यामुळे काहीवेळ वातावरण तणाव पूर्ण झाल होतं. पाण्याचा मुद्दा हा सध्या सगळ्याच राजकीय पक्षांना येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकासाठी महत्वाचा ठरतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा