‘मला ओरिजनल राज ठाकरे व्हायला भाग पाडू नका!’

May 4, 2016 7:30 PM0 commentsViews:

Raj thackray

मुंबई – 03 मे :   पक्षात मी आतापर्यंत खूप लोकशाही पाळली, त्यामुळे मला ओरिजनल राज ठाकरे व्हायला भाग पाडू नका, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नगरसेवकांना दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसेला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आपल्या ‘कृष्णकुंज’वर नगरसेवकांची बैठक बोलावली होती. यावेळी राज यांनी नगरसेवकांना तंबी दिली.

तुम्ही पैशासाठी दुसर्‍या पक्षात जात असाल, तर ते सारे क्षणिक आणि व्यर्थ आहे. तुमच्या काही समस्या असतील काही अडचणी असतील तर त्या थेट माझ्याकडे मांडा. मी सदैव तुमच्यासाठी उपलब्ध आहे, असं राज ठाकरेंनी नगरसेवकांना सांगितल्याचं कळतंय. तसंच, पैशासाठी दुसर्‍या पक्षात जाऊ नका, ते सर्व क्षणीक आहे. आपल्याला दीर्घकालीन उपाय योजना करायचे आहेत. आतापर्यंत मी पक्षात लोकशाहीपद्धतीने वागलो आहे. मला ओरिजनल राज ठाकरे होण्यास भाग पाडू नका, असा इशारा त्यांनी थेट नगरसेवकांना दिले आहे.

मुंबई, नाशिकसह अन्य भागातील नगरसेवक पक्षांतर करत आहे. गेल्या महिनाभरात मनसेचे तीन नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. नाशिकमध्येही मनसेच्या काही नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई पालिकेत मनसेचे 27 नगरसेवक होते. त्यापैकी आता फक्त 22 नगरसेवकच पक्षात उरले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला लागलेली गळती थांबविण्याच्या दृष्टीने राज प्रयत्न करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा