शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरेंनी घेतला पुढाकार

May 4, 2016 5:44 PM0 commentsViews:

लातूर – 04 मे :  शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी राज्य आणि केंद्र सरकारनं प्रयत्न करावेत, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसंच यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटणार अल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उध्दव ठाकरे आज (बुधवारी) मराठवाड्याच्या दौर्‍यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. शिवसेनेच्या वतीने लातूर शहर आणि जिल्ह्यात 50 टँकरने मोफत पाणीपुरवठा तसंच 3 हजार पाण्याच्या टाक्यांचं लोकार्पण उध्दव यांच्या हस्ते करण्यात आलं.

Uddhav2312

सरकारने शेतकर्‍यांना कर्जावरील व्याजमाफी दिली ही चांगली गोष्ट आहे. मात्र, यंदा पेरण्या झाल्याच नाहीत त्यामुळे शेतकरी खचला आहे. शिवाय, त्याच्यावर कर्जाचा डोंगरही आहे. आशात केंद्र आणि राज्य सरकारने शेतकर्‍यांना एकदाचं कजर्मुक्त करावं, असं उध्दव ठाकरे यांनी कलं आहे.

राज्यातील 33 कोटी जनता दुष्काळाच्या खाईत होरपळत आहे. त्यांना या दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न करत असल्याचं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसंच हा दुष्काळ निवारण करण्यास सरकार कुठे कमी पडलं, यावर नंतर बोलू. विरोधकांनाही पावसाळी अधिवेशनात यावर बोलता येईल पण सध्या दुष्काळातून सावरण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं उध्दव ठाकरे म्हणालं.

लातूरला मिरजहून 70 लाख लीटर पाणी रेल्वेनं पोहोचवण्यात आलं आहे. मात्र, ते सगळं पाणी नागरिकांपर्यंत पोहोचलंच नाही. मग हे पाणी गेलं कुठे याची चौकशी व्हावी. सत्य लोकांसमोर यायलाच हवं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लातूरमधल्या सभेनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदही घेतली. त्यावेळी त्यांनी वेगळा विदर्भ आणि मराठवाड्याच्या मागणीला विरोध कायम असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. मराठवाडा संयुक्त महाराष्ट्राच्या विचारांचा आहे. त्यामुळे स्वतंत्र राज्याची मागणी मराठवाडा करुच शकत नाही. विदर्भातील दोन-चार लोक वगळले तर संयुक्त महाराष्ट्रच त्यांनाही हवा आहे. सध्या तर विदर्भ महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहे. मग वेगळं राज्य कशाला हवं, असा सवालही त्यांनी केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा