कोकणावर मेहेरनजर

March 25, 2010 12:28 PM0 commentsViews: 28

अमेय तिरोडकर, मुंबई25 मार्चअर्थमंत्री सुनिल तटकरेंनी आज अर्थसंकल्प सादर करताना कोकणावर घोषणांचा पाऊस पाडला. त्यातही विशेष म्हणजे आपल्या रायगड जिल्ह्यासाठी त्यांनी मुबलक आर्थिक तरतूद करुन ठेवली आहे.कोकणचा नेता बनण्याची सुनील तटकरेंची सुप्त इच्छा आहे. बजेटमध्ये ती सहजपणे जाणवली. रायगडचे पालकमंत्री असलेल्या तटकरेंनी आपल्या जिल्ह्याला 'छप्पर फाड के' दिले आहे. फळे, भाज्या आणि फुलशेतीच्या विकासासाठी रायगड इथे कॉलेज, राजीव गांधी जीवनदायी योजना रायगडपासूनच लागू होणार, जनरल नर्स मिडवाईफ प्रशिक्षण स्कूल रोह्यामध्ये, रायगडमध्ये एक मेडिकल कॉलेज, कोकण क्रीडासंकुल रायगडमध्ये हलवणार, एक ग्रंथालय उपकेंद्र, श्रीवर्धनचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करणार, नानासाहेब धर्माधिकारी आणि कान्होजी आंग्रे यांचे स्मारक उभारणार, रायगड पायथ्याशी पाचाड इथे 5 एकरात शिवसृष्टी प्रकल्प उभारणार, रायगडमध्ये दिघी ते माणगाव आणि माणगाव ते ताम्हाणी घाट या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी 380 कोटी रुपयांची तरतूद, रायगड इथे पोलीस प्रशिक्षण महाविद्यालय स्थापणार असे अनेक निर्णय तटकरेंनी रायगडसाठी घेतले आहेत. मागे पडलेल्या माझ्या जिल्ह्यासाठी मी ही तरतूद केली आहे, असे तटकरेंचे म्हणणे आहे.उर्वरित कोकणासाठीही उदार उर्वरित कोकणासाठीही तटकरे असेच उदार झालेत. किलोमीटरचा सागरी महामार्ग, गुहागर इथे औष्णिक प्रकल्प, जलसिंचन योजनेत कोकणातील दोन नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. रेवस ते रेड्डी राज्य महामार्ग, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये सागरी खाद्य प्रक्रिया केंद्र सुरू करणार, तिलारी प्रकल्पासाठी 125 कोटी रुपयांची तरतूद, सागरी पोलीस दलाचे मुख्यालय रत्नागिरीत उभारणार, अशा अनेक घोषणा त्यांनी केल्या आहेत. कोकण पॅकेजमध्येच यापूर्वी जाहीर केलेल्या अनेक योजना, तटकरेंनी बजेटमध्ये आणल्या. पॅकेजमधला पैसा मिळो न मिळो, परंतू बजेटमधील तरतूद पूर्ण करावीच लागते, याचे तटकरेंना पक्के भान आहे.

close