अखेर विजय मल्ल्यांचा राजीनामा राज्यसभेने स्वीकारला

May 4, 2016 10:30 PM0 commentsViews:

Vijay21323

04 मे :  तब्बल 9,400 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात गेलेले अपक्ष खासदार उद्योगपती विजय मल्ल्या यांचा राजीनामा राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारींनी अखेर स्वीकारला आहे.

विजय मल्ल्यांनी पत्राद्वारे काल (मंगळवारी) हमीद अन्सारींकडे राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा सोपवला होता. मात्र हमीद अन्सारी आणि शिस्तपालन समितीतं त्यावेळी तांत्रिक कारणास्तव राजीनामा फेटाळला होता.

विजय मल्ल्यांची राजीनामावर स्वाक्षरी नसून, त्यांनी कोणतीही कागदपत्रं जोडली नसल्याचं कारण हमीद अन्सारींनी दिलं होतं. मात्र आज अखेर विजय मल्ल्यांच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव पाहून राज्यसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

गेल्याच आठवड्यात परराष्ट्र मंत्रालयाकडून मल्ल्या यांचा राजनैतिक पासपोर्ट रद्द करण्यात आला. ईडीच्या आग्रहाखातर मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला, तर मालमत्तेची पूर्ण माहिती बँकांना देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने मल्ल्या यांना दिले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा