रामदेव बाबांचा लालू प्रसाद यादवांना दिला फेस मसाज

May 4, 2016 1:58 PM0 commentsViews:

04 मे :  योगगुरू बाबा रामदेव यांनी आज राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. या भेटीत बाबा रामदेव यांनी लालूंना आपल्या पतंजली उत्पादनांची माहिती देत त्यांच्या चेहर्‍याची फेस मसाज करून दिली. एवढचं नाही तर लालूंनीही रामदेवबांबांची आणि त्यांच्या स्वदेशी उत्पादनांची अगदी तोंडभरून स्तुती केली.

ramdev

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी बाबा रामदेव हे आज लालू प्रसाद यादव यांच्या निवासस्थानी पोहोचले. बाबांनी जाताना पतंजलींची काही उत्पादनेही सोबत नेली होती. बाबा रामदेव यांनी लालूंना काही उत्पादने खाऊ घातली तर पतंजलीच्या क्रिमने लालूंच्या चेहर्‍याची मसाज करुन देत पतंजलीच्या उत्पादनाची माहिती दिली. बाबा रामदेव यांच्यावर लोक जळतात म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं असल्याचं सांगत लालू प्रसाद यादव यांनीही बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या उत्पादनाचे तोंडभरून कौतूक केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा