राकेश मारिया एटीएसचे प्रमुख

March 25, 2010 1:02 PM0 commentsViews: 2

25 मार्चमहाराष्ट्र पोलीस दलातील काही वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या आज बदल्या करण्यात आल्या. एटीएसच्या प्रमुखपदी राकेश मारिया यांची नियुक्ती करण्यात आली. तर राकेश मारिया यांच्या जागेवर हिमांशू रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.रॉय यांच्या जागी रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली. पकडलेल्या संशयीत दहशतवाद्यांची माहिती मीडियाला देणे के. पी. रघुवंशींना महाग पडले आहे. प्रकरणाचा तपास सुरू असताना मीडियाला दहशतवाद्यांची माहिती देण्यावरून केंद्रीय गृहमंत्रालयाने नाराजी व्यक्त केली होती.तसेच त्यांच्यावर कारवाईची सूचनाही गृहमंत्रालयाने केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज रघुवंशींची बदली करण्यात आली. त्यांची बदली अतिरिक्त पोलीस महासंचालक , कायदा आणि सुव्यवस्था या पदावर करण्यात आली आहे.

close