किनन-रुबेन हत्येप्रकरणी चारही आरोपींना जन्मठेप

May 5, 2016 2:09 PM0 commentsViews:

Keenan-Reuben

05 मे :  किनन आणि रुबेन हत्या प्रकरणी सत्र न्यायालयाने चारही आरोपींना दोषी ठरवलं असून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जितेंद्र राणा, सतिश दुलहज, सुनिल दुलहज आणि दिपक तिवाल यांनी 2011 मध्ये किनन आणि रुबेन यांची हत्या केली होती. मैत्रिणीची छेड काढणार्‍यांचा विरोध केला म्हणून 24 वर्षांचा किनन सँतोज आणि 28 वर्षांचा रुबेन फर्नांडिस यांची अंधेरीत भर रस्त्यात चाकू भोसकूनं हत्या करण्यात आली. घटनेच्या दुसऱयाच दिवशी चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी आज सत्र न्यायालयाता झालेल्या सुनावणीत चारही नराधमांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली.

एकूण 28 साक्षीदारांची साक्ष न्यायालयात घेण्यात आली होती ज्यामधले 5 जण घटनास्थळी उपस्थित होते. यामध्ये किनन आणि रुबेन यांच्या दोन पिडीत मैत्रिणींचादेखील समावेश होता’, अशी माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. त्यामुळे आरोपी छेड काढण्याचा आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ठोस न्यायालयाला मिळाले, असे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं. पिडीतांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न देखील केला होता. पण आरोपींना धारधार हत्यारांनी किनन आणि रुबेन यांची हत्या केली होती, असंही निकम पुढे म्हणालं.

दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयावर किननचे वडील वालेरियन सँतोज यांनी समाधान व्यक्त केलं आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा मला आनंद आहे. या प्रकरणात फाशी होण्याची शक्यता फारच कमी होती, म्हणूनच चौघांना जन्मठेप व्हावी हीच माझी मागणी होती आणि न्यायालयाने ती मान्य केली, असं किननचे वडिल म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा