भुजबळांच्या अडचणीत वाढ; सीए सुनील नाईक होणार माफीचा साक्षीदार

May 5, 2016 6:20 PM0 commentsViews:

sadsadasdas newopy

मुंबई – 05 मे : महाराष्ट्र सदन आणि अन्य गैरव्यवहारांप्रकरणी सध्या अटकेत असलेले छगन भुजबळ यांच्या अडचणी आता आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. ईडीने अटक केलेले भुजबळांचे सीए सुनील नाईक यांनी आज (गुरूवारी) कोर्टात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे भुजबळांच्या गैरव्यवहारांचा संपूर्ण तपशील उघड होण्याची शक्यता आहे.

ईडीने आज (गुरूवारी) सकाळी सुनील नाईक यांना त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली होती. त्यानंतर त्यांना आज संध्याकाळी पाच वाजता कोर्टात हजर करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी मनी लाँड्रींग प्रकरणी विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज आणि सुनील नाईक यांच्यासह आणखी 29 जणांविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. नाईक हे भुजबळांच्या वांद्रे इथल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टचे सीए होते. याशिवाय, समीर आणि छगन भुजबळ यांच्या पैशांच्या हवालामार्फत अफरातफरी आणि महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानण्यात येतो.

त्यामुळेच ईडीने भुजबळांभोवतीचे फास आवळण्यासाठी नाईकांना गळाला लावल्याची चर्चा आहे. माफीचा साक्षीदार बनवण्याच्या अटीवरच सुनिल नाईक यांनी इडीला सर्व माहिती पुरवल्याची माहिती इडी सुत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे सुनिल नाईक यांची औपचारिक अटक दाखवून पुढे जामिन देण्याच्या अटींवर अटक करण्यात आल्याची माहिती इडी सुत्रांनी दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा