डोंबिवलीत महिलांना मॅक्सी घालून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी

May 5, 2016 5:57 PM1 commentViews:

†¦üÃÖ¾ÖÝÖ®ÖŸÖÝÖ2131

मुंबई – 05 मे :  गेल्या काही दिवसांपासून महिलांचा मंदिर प्रवेश चांगलाच गाजत असून राज्यभर भूमाता ब्रिगेडसह महिला संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच डोंबिवलीमध्ये मॅक्सी घालून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी असल्याचा फलक मंदिराबाहेर लावण्यात आला आहे. याबाबत संबंधित मंदिर प्रशासनाने आम्ही श्रद्धाळू आहोत, अंधश्रद्धाळू नाही. मात्र मंदिराची पवित्रता राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

महिलांना मंदिर प्रवेशासाठी शनीशिंगणापूरपासून सुरू झालेले आंदोलनाचे लोण त्र्यंबकेश्वर मंदिर आणि आता हाजीअली दर्गापर्यंत येऊन पोहचलं आहे. त्यातच आता डोंबिवली पूर्वेकडील कोपर गावात असणार्‍या गावदेवी मंदिर, महादेव मंदिर आणि हनुमान मंदिरात महिलांना मॅक्सी घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तशी सूचना असलेले फलक मंदिराबाहेर लावण्यात आले आहेत.

राज्यभर सुरू असणार्‍या मंदिर प्रवेश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे फलक चर्चेचा विषय ठरले आहेत. याबाबत गावदेवी मित्र मंडळ आणि तीनही मंदिराची देखभाल करणारे शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आम्ही पुरोगामी विचारसरणीचे आहोत, अंधश्रद्धाळू नाही. पण मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असून नागरिकांनी या निर्णयाचे समर्थन केल्याचे सांगितलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Yogesh Shelar

    मुस्लिम महिला मस्जिद मध्ये जाताना बुरखा घालतात, त्या नाही जात म्याक्सी घालून, कारण त्यांच्या धर्माचं पावित्र्य राखणं त्यांना शिकवावं लागत नाही. हिंदू धर्मात मात्र महिलांना मंदिरात कपड्यांचं बंधन घातलं तर ते त्यांना स्वतःचा अपमान वाटतो. धर्म रक्षणासाठी फक्त काहीच व्यक्तींनी ठेका घेतलाय असा यांचा रुबाब असतो आणि वाद निर्माण करण्यासाठी राजकारणी आणि मिडिया आहेच कि.