मुस्लिमांच्या आरक्षणाला मान्यता

March 25, 2010 1:10 PM0 commentsViews: 1

25 मार्चमुस्लिमांना 4 टक्के आरक्षण देण्याच्या आंध्रप्रदेश सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. त्यामुळे नोकरी आणि शिक्षणात मुस्लिमांना आता आरक्षण मिळणार आहे. पण कायद्यात नमूद करण्यात आलेल्या मुस्लिम समाजातील 14 जातींनाच हे आरक्षण मिळणार आहे. ऑगस्ट 2010मध्ये यावर अंतिम सुनावणी होणार आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये आणि नोकर्‍यांमध्ये मुस्लिम समाजाला 4 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हायकोर्टाने फेटाळून लावला होता.त्याला आंध्रप्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

close