गोवंडीमध्ये झोपडपट्टीत लागलेली आग आटोक्यात

May 6, 2016 9:00 AM0 commentsViews:

govandi3मुंबई – 06 मे : गोवंडीमध्ये झोपडपट्टीत लागलेली आग आता बर्‍यापैकी आटोक्यात आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण ही आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान 20 टक्के भाजलाय.

घाटकोपरच्या मानखुर्द लिंक रोडनजीकच्या गौतम नगर भागात पहाटे 4 वाजेच्या सुमारास आग लागली होती. सिलेंडर स्फोटामुळे ही आग लागली अशी माहिती स्थानिकांनी दिली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी धाव घेतली. शर्थीच्या प्रयत्नानंतर सकाळी आग आटोक्यात आली. या दुर्घटनेत 50 पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झाल्यात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा