पीककर्ज माफ करणे शक्य आहे का ?, कोर्टाची सरकारला विचारणा

May 6, 2016 9:18 AM0 commentsViews:

Mumbai high courtमुंबई – 06 मे : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकर्‍यांचे पीककर्ज पूर्णपणे माफ करणे शक्य आहे का ?, अशी विचारणा हायकोर्टाने राज्य सरकारकडे केलीये. तसंच या वर्षी नवीन पीककर्ज देताना मागील थकबाकीबाबत आग्रह धरू नये, अशी अपेक्षाही न्यायालयाने व्यक्त केली आहे.

गुरुवारी उच्च न्यायालयाने औरंगाबाद आणि मुंबई येथे झालेल्या निरनिराळ्या याचिकांवरील सुनावणी झाली. या आधीच्या सुनावणीत गेल्या पुढील दीड महिना दुष्काळाशी कसा सामना करणार आण काय उपाययोजना आखल्यात अशी अशी विचारणा कोर्टाने केली होती. दुसर्‍या दिवशी कोर्टाने, या वर्षी नवीन पीककर्ज देताना मागील थकबाकीबाबत आग्रह धरू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली. याखेरीज सोलापूरच्या उजनी धरणातून मराठवाड्याची तहान भागवण्याचा विचार करावा, अशी सूचनाही कोर्टाने केलीये. राज्यातील दुष्काळाचा विचार करून शासनाने शेतकर्‍यांचे पीक कर्ज माफ करावे, अशी विनंती करणारी याचिका माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीत कर्जमाफीबाबतची विचारणा करण्यात आलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा