काँग्रेस नेत्यांकडूनच विरोधकांना छुपी मदत – नारायण राणे

October 13, 2008 9:05 AM0 commentsViews: 20

13 सप्टेंबर, मुंबई – काँग्रेसमध्ये बंडाची तलवार म्यान केलेल्या नारायण राणे यांनी पुन्हा एकदा, पक्षांतर्गत असंतोष व्यक्त केला आहे. ' विरोधक फक्त आपल्यालाच टार्गेट करतात , कारण काँग्रेसच्या इतर नेत्यांशी त्यांचे आतून संबंध आहेत ' , असा थेट आरोप राणे यांनी केला. राणे यांचा मुलगा नितेश यांच्या ' स्वाभिमान संघटने ' च्या मुंबईत झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. काँग्रेसमध्ये आपल्याला एकटं पाडलं जात असल्याबाबतची नाराजी नारायण राणे यांनी वारंवार व्यक्त केली आहे. अशीच नाराजी पुन्हा एकदानितेश राणेच्या ' स्वाभिमानी संघटने ' च्या मेळाव्यात त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे इतर नेते विरोधकांना मदत करत असल्याचा थेट आरोप त्यांनीरामदास कदम यांच्यावर टीका करताना केला.नितेश राणे यांची स्वाभिमानी संघटना विधायक कामांसाठी स्थापन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. याचबरोबर आपण स्वतंत्र पक्ष काढणार आहोत, ही चर्चा निरर्थक असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.या मेळाव्यात निवडणुका जवळ येत असल्याचं राणे आणि त्यांचा मुलगा नितेश यांनी वारंवार सांगितलं. एकंदरीतच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी पक्षांतर्गत नाराजी व्यक्त केली आहे. तर पक्षातील आणि विरोधी पक्षातील आपल्या शत्रूंना एकाचवेळी आव्हानही दिलं आहे.

close