लाचखोर अधिकार्‍याकडे कोट्यवधीची माया ; 2 किलो सोनं, हैदराबादमध्ये 10 फ्लॅट्स

May 6, 2016 10:49 AM0 commentsViews:

वसई – 06 मे : लाच देताना एखाद्या अधिकार्‍याला अटक झाली अशी बातमी आपण नेहमी बघतो. मात्र, वसई विरार महापालिकेच्या नगरविकास विभागाचे उपसंचालक वाय. शिवा रेड्डी यांना काही दिवसांपूर्वी 25 लाखांची लाच देताना अटक झाली होती. अँटी करप्शन विभागानं रेड्डीच्या निवासस्थानी जेव्हा धाड टाकली तेव्हा त्यांना प्रचंड मोठं घबाड सापडलं त्यांची कोट्यवधींची माया पाहून अधिकाराही अचंबित झाले.

रेड्डीकडे सापडलेलं घबाड

- दोन किलो सोनं आणि दागिने
- 33 लाखांची रोख रक्कम
- हैदराबादमध्ये 10 अलिशान फ्लॅट्स
- वसई विरारमध्ये 5 फ्लॅट्सreddy

महापालिकेचे शिवसेनेचे गटनेते, नगरसेवक धनंजय गावडे यांना रेड्डी याने लाच देऊ केली होती. अनेक प्रकरणांमध्ये RTI खाली माहिती मागवू नये किंवा पोलीस स्टेशनमध्ये कुठलीही तक्रार करू नये यासाठी रेड्डी यांनी गावडे यांना आमिष दाखवलं होतं. गावडे यांनी अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केली होती त्यावरून सापळा रचून त्याला अटक करण्यात आली होती.

वाय शिवा रेड्डी यांना ठाणे अँटी करप्शन ब्युरोने अटक केल्याच्या नंतर त्यांची कसून चौकशी चालू होती. वसई एव्हरशाई सिटी येथील गिता अपार्टमेंटमध्ये रेड्डी यांचा सहाव्या मजल्यावर सहाशे चार नंबरचा फ्लॅट आहे. रात्री दोन वाजेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत या फ्लॅटमध्ये त्यांच्या घराची झडती चालू होती. शेवटी सकाळी आठ वाजता रेड्डी यांचा रुम सिलकरुन त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या झाडाझडतीत रेड्डीच्या घरातून तब्बल 2 किलो सोनं आणि दागिने, 33 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. एवढंच नाहीतर हैदराबादमध्ये रेड्डीचे 10 अलिशान फ्लॅट्स असल्याचं समोर आलंय. तर वसई विरारमध्येच रेड्डीचे 5 फ्लॅट्स असल्याचं समोर आलंय. सर्व मालमत्ता जप्त करण्यात आलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा