राज्यात गोवंश हत्या बंदी कायम, मात्र राज्याबाहेरुन आणलेलं गोमांस खायला परवानगी

May 6, 2016 3:44 PM0 commentsViews:

06 मे : राज्यात लागू असलेला गोवंश हत्या बंदीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. मात्र, गोमांस विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यात गोवंश हत्या करता येणार नाही. मात्र, राज्याबाहेरुन आणलेलं गोमांस खायला परवानगी दिली आहे.

beef_ban3

मागील वर्षी युती सरकारने राज्यात गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू केला होता. या विधेयकाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मान्यता दिली होती. या कायद्यानुसार महाराष्ट्र पशू संवर्धन कायद्यानुसार गोवंशातील पशूंची हत्या केल्यास पाच वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपये दंड तर गोमांस बाळगल्यास 1 वर्षाचा तुरुंगवास आणि 2 हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात खाटीक संघटना आणि इतरांनी कोर्टात धाव घेतली होती. गेल्या वर्षीच नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाची सुनावणी संपली होती. या वर्षी जानेवारीत कोर्टाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. आज आज मुंबई उच्च न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला. उच्चन्यायलयाने गोवंश हत्या बंदी उठवण्यास नकार दिलाय. पण, गोमांस विक्रेत्यांना न्यायालयाने दिलासा दिलाय. या पुढे इतर राज्यातून गोमांस आणून राज्यात विक्री करता येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा