पुण्यात ग्रंथदिंडीचा उत्साह

March 25, 2010 2:32 PM0 commentsViews: 1

25 मार्चसाहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला आज पुण्यात ग्रंथदिंडी काढण्यात आली. हिरा बागेपासून या ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. त्यानंतर बाजीराव रोड, लक्ष्मी रोड, टिळक रोडमार्गे ही दिंडी एस. पी. कॉलेजच्या ग्राऊंडवर पोहोचली. यात वेगवेगळ्या पथकांचा समावेश होता. पारंपारिक वेशभूषेत पुणेकर या दिंडीत सहभागी झाले. वारकरी, शालेय विद्यार्थी, झांजपथके, ढोलताशे, सनई चौघडे, या ग्रंथदिंडीत सहभागी झाले. महिलांनी या दिंडीत फेर धरला, फुगड्या खेळल्या. संमेलनाचे अध्यक्ष द. भि. कुलकर्णी रथात बसून या ग्रंथदिंडीत सहभागी झाले. संमेलनस्थळी ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

close