साहित्याचा उत्सव सुरू

March 26, 2010 8:09 AM0 commentsViews: 1

26 मार्चपुण्यातील विंदा करंदीकर साहित्य नगरीत आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मोठ्या उत्साहात उद् घाटन झाले. ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी संमेलनाचे उद् घाटन केले.सोहळ्याची सुरूवात महाराष्ट्र गीताने झाली. या उद् घाटन सोहळ्यात एक वेगळा पायंडा पाडला गेला. दीप्रज्वलन हे उद् घाटक ना. धो. महानोर आणि पुस्तकविक्रेते विलास आठवले या दोघांच्या हस्ते केले गेले. पंढरपूरच्या वारीत एका वारकर्‍याला श्रीविठ्ठलाच्या अग्रपूजेचा मान मिळतो तसाच हा मान बाजीराव रोडवरच्या या पुस्तकविक्रेत्याला मिळाला.यावेळी महानोर, संमेलनाध्यक्ष द. भि. कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गेल्या वेळचे वादग्रस्त अध्यक्ष आनंद यादव यांचाही सत्कार करण्यात आला. उद् घाटनाच्या सोहळ्याला हजेरी लावलेल्या तब्बल 11 माजी संमेलनाध्यक्षांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. अनेक साहित्यिकांसोबतच अभिनेते श्रीराम लागू, पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, काँग्रेसचे नेते उल्हासदादा पवार आदींनी संमेलनाला हजेरी लावली आहे.

close