अमिताभची सोबत नको

March 26, 2010 8:22 AM0 commentsViews: 1

26 मार्चअभिनेते अमिताभ बच्चन आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहित्य संमेलनात एकत्र येण्याची शक्यता आता मावळली आहे. अमिताभ बच्चन मंचावर नसताना मुख्यमंत्री साहित्य संमेलनात येतील अशी माहिती मिळत आहे. काँग्रेस हायकंमाडनेच बच्चन यांच्यासोबत मंचावर उपस्थित न राहण्याचा सल्ला दिल्याचेही समजते. वांद्रे- वरळी सी लिंकच्या उद्घाटनाच्या वेळी अमिताभ यांना बोलावण्याच्या मुद्द्यावरुन मोठा वाद झाला होता. काँग्रेस हायकमांडने या बद्दल चव्हाण यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

close