टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय टीमची निवड

March 26, 2010 8:31 AM0 commentsViews: 4

26 मार्च टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय टीमची आज निवड करण्यात आली. एप्रिलच्या अखेरीस वेस्टइंडिजमध्ये टी-20 वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. मुंबईत बीसीसीआयला झालेल्या निवड समितीच्या बैठकीत पंधरा खेळाडूंची भारतीय टीम जाहीर करण्यात आली. आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणार्‍या विनय कुमार आणि रोहित शर्माला टीममध्ये संधी मिळाली आहे. तर पियुष चावला आणि आशिष नेहराची टीममध्ये वर्णी लागली आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सतचा कॅप्टन दिनेश कार्तिकनेही टी-20 वर्ल्डकपमध्ये आपली जागा पक्की केली आहे. 30 संभाव्य खेळाडूंमधून टीम निवडली गेली आहे. 30 एप्रिलपासून वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्डकप रंगणार आहे.

close