उमेदवाराने विकले 3 लाखांना तिकीट

March 26, 2010 9:56 AM0 commentsViews: 1

26 मार्चनवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने तब्बल 3 लाख रुपयांना तिकीट विकल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. वॉर्ड क्रमांक 42 ची उमेदवारी काँग्रेसने संतोष जाधव या काँग्रेसच्या वॉर्ड अध्यक्षाला दिली होती. पण या संतोष जाधवने 3 लाख रुपयांना काँग्रेसचा अधिकृत एबी फॉर्म विकला.संतोष जाधव याला शिवसेनेकडून तिकीट जाहीर केल्यानंतरही काँग्रेसने त्यालाच उमेदवारी दिली. या निवडणुकातील ही दुसरी घटना आहे. याआधी काँग्रेसचे नेते हरिबंस सिंह यांच्या मुलानेही आपला एबी फॉर्म दुसर्‍या व्यक्तीला दिला होता. त्यालाही काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती. प्रदेश काँग्रेसकडून नाव न टाकताच, एबी फॉर्मचे वितरण केले गेले. त्यातूनच असे प्रकार घडत आहेत.

close