मराठवाड्याला वादळी वार्‍यासह गारपीटीने झोडपलं

May 6, 2016 10:47 PM0 commentsViews:

vlcsnap-2016-05-06-22h42m26s138

06 मे :  दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील लातूर, औरंगाबाद आणि बीडमध्ये आज (शुक्रवारी) दुपारी तीनच्या सुमारास वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारांसह पाऊस झाला. अचानक झालेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली.

चाकूरसह जिल्ह्यातील उन्हाच्या पार्‍याने 43 अंशाचा टप्पा पार केला असून आजच्या गारपीटीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उन्हाच्या कडाक्यापासून चाकूर वासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गारांसह झालेल्या आजच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याची अधिकृत माहिती आद्याप प्राप्त झालेली नाही.

तर बीड जिल्ह्यात आज अंबेजोगाईत तालुक्यातील तळणी घाटनांदुर भागात वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस पडला. वाढत्या उकाड्यात अचानक पावसाची सुरूवात झाल्याने नागरिक सुखावले. तळणी घाटनांदुर भागात गारांचा पाऊस पडला. या गावात गारांमुळे घरावरचे पत्रे उडून गेले, तसंच झाडंही ऊन्मळून पडली. आष्टी तालुक्यातही आज पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तापमाचा पारा चांगलाच वाढला होता त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा