कांजूरमार्गमध्ये इमारतीची भिंत कोसळली, 1 ठार

May 7, 2016 1:24 PM0 commentsViews:

kanjurmargमुंबई – 07 मे : मुंबईच्या कांजूरमार्ग भागातल्या कर्वेनगरमध्ये एका इमारतीची भिंत कोसळलीय. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय. इमारतीच्या ढिगाराखाली काही जण अडकण्याची भिती वर्तवली जात आहे. एसआरए इमारतीचं बांधकाम सुरू होतं. या इमारतीची भिंत शेजारी झोपडपट्टीवर कोसळली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल झाल्या आहेत. रेस्क्यू व्हॅन आणि दोन ऍम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा