दुष्काळप्रश्नी मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दरबारी दाखल

May 7, 2016 1:33 PM0 commentsViews:

 cm meet pm modi4

दिल्ली – 07 मे : दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दरबारी दाखल झाले आहे. मुख्यमंत्री आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. या भेटीत महाराष्ट्राच्या वाट्याला काय येत हे पाहण्याचं ठरणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले आहेत. या बैठकीत ते राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा पंतप्रधानांसमोर सादर करणार आहेत. त्यानंतर इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही दुष्काळाबाबत चर्चेसाठी बोलावलं जाणार आहे. कर्नाटक आणि उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्रीही त्या त्या राज्यांमधल्या दुष्काळाची माहिती पंतप्रधानांना सांगणार आहेत.फडणवीस आणि मोदींच्या बैठकीचं फलित काय असेल, याकडे दुष्काळग्रस्त बळीराजाचं लक्ष लागलंय.

(संग्रहित छायाचित्र)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा