अवैध जात प्रमाणपत्रामुळे कोल्हापूर पालिकेत 4 नगरसेवकांची पदं रद्द

May 7, 2016 1:44 PM0 commentsViews:

kolhapur3307 मे : जात वैधता प्रमाणपत्र जातपडताळणी समितीने अवैध ठरवल्याने कोल्हापूर महानगरपालिकेच्या 4 नगरसेवकांची पदं रद्द झाली आहे. यामध्ये काँग्रेसच्या दोन तर भाजप आणि ताराराणी आघाडीच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचं पद रद्द झालंय.

अहवालानुसार निलेश देसाई आणि संदीप नेजदार यांचं पद रद्द करण्याची कारवाई आयुक्तांनी केलीय. महापौरांसह अजून पाच नगरसेवकांवर टांगती तलवार कायम आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आरक्षित जागेवर निवडून आलेल्या नगरसेवकांनी 30 एप्रिल पूर्वी जात वैधता प्रमाणपत्र दिले नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कचाट्यात सापडले असताना जातीचे दाखले अवैध ठरल्याने 4 नगरसेवकांचे पद रद्द झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजून पाच नगरसेवकांचे दाखले प्राप्त होणे बाकी असून त्यामध्ये महापौर अश्विनी रामाने यांचाही समावेश आहे. त्यामुळे या पाच
जणांकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा