राम शिंदेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात, 1 जणाचा मृत्यू

May 7, 2016 7:59 PM0 commentsViews:

 
ram_shinde307 मे : राज्याचे गृहराज्य मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे अपघातातून थोडक्यात बचावले. श्रीरामपूर नेवासा रोडवर शिंदे यांच्या ताफ्यातील पोलीस पायलट गाडी आणि कारचा अपघात झाला. या अपघातात 1 जण ठार झालाय. तर  8 जण जखमी झाले आहे. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. आज दुपारी श्रीरामपूर नेवासा रोडवर ताफ्यातील पोलीस गाडीची मारूती अल्टो कारला जोराची धडक झाली. या अपघातात सुदैवाने शिंदे यांना कोणतीही दुखापत झाली नाही. स्वत :राम शिंदे यांनी जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा