हुसेन यांची याचिका फेटाळली

March 26, 2010 10:16 AM0 commentsViews: 4

26 मार्च प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी दाखल केलेली एक याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. आपल्यावरचे सगळे खटले रद्द करण्यात यावेत, अशी याचिका हुसेन यांनी दाखल केली होती. सोबतच त्यांना भारतात येण्यायोग्य परिस्थिती निर्माण करण्यात यावी अशीही मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने ही याचिका आज फेटाळून लावली. यापूर्वी हुसेन यांच्यावरील देशभरातील सर्व खटले दिल्लीला हलवण्यात आले होते. पण आता त्यांच्याविरुद्धच्या तक्रारी रद्द करणे शक्य नसल्याचे सरन्यायाधिशांनी ही याचिका फेटाळताना म्हटले आहे.

close