महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांच्या रजेचा अर्ज नामंजूर

October 13, 2008 9:25 AM0 commentsViews: 44

13 सप्टेंबर, मुंबई – राज्याचे पोलीस महासंचालक अनामी रॉय यांचा रजेचा अर्ज गृहमंत्रालयाने नामंजूर केला आहे. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरण अर्थात ' कॅट ' नं त्यांची महासंचालक पदावरची नियुक्ती रद्द केल्यानंतर रॉय हे आजपासून रजेवर जाणार होते. पण ढासळलेली कायदा सुव्यवस्था, तसंच पुण्यातल्या युथ कॉमनवेल्थ गेम्ससाठी ठेवण्यात आलेला पोलिसांचा बंदोबस्त यामुळं रॉय यांची रजा नामंजूर करण्यात आल्याचं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. मात्र रॉय यांना महासंचालकपदावर कायम ठेवण्यासाठी गृहमंत्रालयाची ही धडपड सुरू असल्याचं बोललं जात आहे.

close